उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक २०२४

जानेवारी २०२३ ते डिसेंबर, २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या, मराठीतीतील विज्ञान विषयक उत्तम पुस्तकाला मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक’ (स्वरूप रोख रु.१,०००/- व प्रमाणपत्र) देण्यात येईल.

पुस्तकाचे स्वरूप पाठ्यपुस्तक किंवा हस्तलिखित अथवा संपादित नसावे.

इच्छुक लेखक-प्रकाशकांनी आपल्या पुस्तकाच्या प्रत्येकी तीन प्रती तपशीलासह (नाव, पत्ता, दूरध्वनी, इ-मेल) पाठवाव्यात.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २० फेब्रुवारी२०२४ पर्यंत

संपर्क : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान, भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२
दूरध्वनी : (०२२) ४८२६३७५०/४८२६००९४.
भ्रमणध्वनी : ९९६९१००९६१ (सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान ,मंगळवार खेरीज)
इ-मेल : office@mavipa.org