वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धा – २०२३

वार्षिक निबंध स्पर्धा २०२३ राज्यस्तरीय – निकाल

विद्यार्थी गट – विषय: शिक्षणाचे डिजिटायझेशन ( सहभाग – ३३८)

प्रथम क्रमांक : कु.शर्वरी पिंपळकर (कुरखेडा,जि.गडचिरोली)
द्वितीय  क्रमांक: कु.मृण्मयी जोग (पिंपळी खुर्द,जि.रत्नागिरी)

ही पारितोषिके अनुक्रमे रू. २,००० आणि रू. १,५०० या रकमांची असून त्यासोबत प्रमाणपत्र दिले जाईल. या राज्यस्तरीय परीक्षणाचे काम मविप औरंगाबाद विभागातर्फे  डॉ. दिलीप डांगे यांनी केले.

खुला गट – विषय: पंच्चाहत्तर वर्षांतील भारताची वैज्ञानिक प्रगती ( सहभाग – ११३ )

प्रथम क्रमांक: श्रीमती धनश्री देवधर (विजयदुर्ग,जि.सिंधुदुर्ग)
द्वितीय क्रमांक : श्री रामकृष्ण अघोर ( सोलापूर)

ही पारितोषिके अनुक्रमे रू. २,५०० आणि रू. २,००० या रकमांची असून सोबत प्रमाणपत्र दिले जाईल. राज्यस्तरीय परीक्षणाचे काम मविप औरंगाबाद विभागातर्फे  श्री चंद्रशेखर बर्दापूरकर  यांनी पाहिले.


खुला गट विषय : पंचाहत्तर वर्षांतील भारताची वैज्ञानिक प्रगती :

दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर लोकशाही व्यवस्था स्वीकारून देशाने आपला कारभार आपणच करायला सुरुवात केली. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा अन्नधान्य, उत्पादन, उद्योग, दळणवळण, संदेशवहन इत्यादी अनेक क्षेत्रांत देश म्हणून आपण खूप मागे होतो. मात्र, या व अशा विविध क्षेत्रांत भारताने गेल्या पंचाहत्तर वर्षांत लक्षणीय प्रगती केली आहे. या प्रगतीत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता, दूध उत्पादनात भरीव प्रगती, दळणवळणाच्या क्षेत्रात रस्ते वाहतुकीपासून ते हवाई वाहतुकीपर्यंत, संदेशवहनाच्या क्षेत्रात साध्या एका जागी बसवलेल्या दूरध्वनीपासून ते स्मार्ट फोनपर्यंत, वस्त्रोद्योगातील प्रगती, संरक्षण व बांधकाम क्षेत्र इत्यादी अनेकानेक क्षेत्रांत आपण मोठी मजल मारली आहे.

भाभा अणुसंशोधन केंद्र, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, या व अशा अनेक संस्थांनी देदीप्यमान कामगिरी केलेली आहे. या सगळ्या प्रगतीचा सम्यक आढावा या निबंधात अपेक्षित आहे.

विद्यार्थी गट विषय : शिक्षणाचे डिजिटायझेशन :

आपल्या दैनंदिन जीवनातील सगळ्याच क्षेत्रांत अंकीय (डिजिटल) पद्धतींचा व त्यावर आधारित उपकरणे / यंत्रे यांचा वापर वाढत असून शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. कोविड-१९मुळे अचानक या मार्गाचा वापर अपरिहार्य म्हणून अंगीकारावा लागला. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना स्वीकारलेली आभासी शिक्षणाची पद्धत आणि पूर्वापार चालत आलेली विद्यार्थी व शिक्षक समक्ष उपस्थित राहून दिली जाणारी शिक्षणाची पद्धत, यांत बराच फरक आहे. दोन्ही पद्धतींचे फायदे-तोटे आहेत, तसेच मर्यादा आहेत. यामधून सुवर्णमध्य काढण्यासाठी (अगदी १०० टक्‍के नसला तरी) अशा मर्यादित डिजिटायझेशनचा उपयोग शिक्षणात चांगल्या प्रकारे कसा करता येईल, तसेच प्रत्यक्ष अनुभव, एकमेकांशी संवाद, क्षेत्रभेटी यांचा समावेश कसा करता येईल, याविषयी विचार निबंधात अपेक्षित आहेत. सध्या शिक्षण घेत असलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना या दोन्ही पद्धतींचा अनुभव आहे, हे इथे ध्यानात घेतले आहे.

(सूचना: छायाचित्रे, कात्रणे इत्यादींचा अंतर्भाव निबंधात करू नये.)

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क :

मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२.

दूरध्वनी : ०२२-२४०५४७१४, ०२२-२४०५७२६८.

इ-मेल : office@mavipa.org

स्पर्धेचे नियम :

१) महाराष्ट्राचे खालीलप्रमाणे पाच भौगोलिक विभाग आणि बृहन्महाराष्ट्राचा सहावा विभाग केला असून, विद्यार्थी आणि खुल्या गटातील स्पर्धकांनी आपले निबंध खालीलप्रमाणे पाठवावेत.

दिलेल्या पत्त्यावर निबंध पाठविण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट, २०२३ ही आहे.

२) विभाग १ : मुंबई शहर व कोकण विभाग
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांतील स्पर्धकांनी आपले निबंध, प्रा. डॉ. उमेश संकपाळ, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभाग, द्वारा रसायनशास्त्र विभाग, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी ४१५६१२ यांच्याकडे पाठवावेत.

विभाग २ : दक्षिण महाराष्ट्र विभाग
सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांतील स्पर्धकांनी आपले निबंध, डॉ. अंजली साळवी, अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, कोल्हापूर विभाग, डी-१, अमेय प्लाझा, ओपल हॉटेलमागे, राजारामपुरी, कोल्हापूर, ४१६००८ येथे पाठवावेत.

विभाग ३ : उत्तर महाराष्ट्र विभाग

जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांतील स्पर्धकांनी आपले निबंध डॉ. राजेंद्र अहिरे, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, साक्री विभाग, १२, प्रतीक, अकलाडे नगर, साक्री, जि. धुळे ४२४३०४ यांच्याकडे पाठवावेत.

विभाग ४ : मराठवाडा विभाग

औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, जालना, हिंगोली या जिल्ह्यांतील स्पर्धकांनी आपले निबंध श्री. सुधीर देशमुख, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, माजलगाव विभाग, रेणुका निवास, गजानन नगर, गजानन मंदिरामागे, माजलगाव, जि. बीड ४३११३१. यांच्याकडे पाठवावेत.

विभाग ५ : विदर्भ विभाग

चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, भंडारा, नागपूर, वर्धा, बुलढाणा, गडचिरोली, वाशिम, गोंदिया या जिल्ह्यांतील स्पर्धकांनी आपले निबंध प्रा. महादेव खाडे, अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, वणी विभाग, प्रगती नगर, वणी, जि. यवतमाळ ४४५३०४. यांच्याकडे पाठवावेत.

विभाग ६ : बृहन्महाराष्ट्र

महाराष्ट्राबाहेरील वडोदरा, गोवा, पेडणे आणि निप्पाणी इत्यादी ठिकाणच्या स्पर्धकांनी आपले निबंध श्रीमती अंजली देसाई, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, गोवा विभाग, गोमंत विद्या निकेतन, आबाद फरीया रोड, मडगाव, गोवा ४०३६०१. यांच्याकडे पाठवावेत.

३) प्रत्येक भौगोलिक विभागातील शालेय गटासाठी पहिल्या व दुसऱ्या क्रमांकांच्या निबंधांना अनुक्रमे रु. ८००/- व रु. ४००/- तर खुल्या गटासाठी अनुक्रमे रु.१,००० व रु. ५००/- ची पारितोषिके दिली जातील. विभागाने निर्णय मध्यवर्तीस स्वतंत्रपणे कळविल्यावर पारितोषिकांची रक्कम थेट विजेत्यांना मध्यवर्तीकडून पाठविली जाईल. विद्यार्थी गटाची पारितोषिके रमाकांत टिपणीस स्मृतिप्रीत्यर्थ दिली जातात.

४) प्रत्येक भौगोलिक विभागातील दोन्ही गटांतील पहिले दोन निबंध अंतिम परीक्षणासाठी डॉ. रंजन गर्गे, अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, औरंगाबाद विभाग, विहंग, एन-३/४०६, सिडको, औरंगाबाद ४३१००३ येथे ३० सप्टेंबर, २०२३ पर्यंत पाठवावेत. निरनिराळ्या भौगोलिक विभागांकडून आलेल्या निबंधांचे परीक्षण राज्यस्तरावर पुन्हा स्वतंत्रपणे होईल. त्यांतील पहिल्या दोन क्रमांकांना खुल्या गटासाठी अनुक्रमे रु. २,५००/- आणि रु. २,०००/-, विद्यार्थी गटासाठी अनुक्रमे रु. २,०००/- आणि रु.१,५००/- अशी पारितोषिके दिली जातील.

५) स्पर्धेत त्या-त्या ठिकाणी उल्लेख केलेल्या गटांच्या पातळीप्रमाणे कोणासही भाग घेता येईल. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नाही. निबंध कागदाच्या एका बाजूस सुवाच्य अक्षरात लिहावा. मात्र, ज्या व्यक्तीस निबंध स्पर्धेत दोनदा पारितोषिके मिळाली आहेत, त्याने परत भाग घेऊ नये.

६) शब्दसंख्या १५०० ते २००० असावी. लिखाण कागदाच्या एकाच बाजूला असावे. स्वहस्ताक्षरात
असल्यास उत्तम. कागद ए-४ आकाराचा असावा.

७) साहित्याबरोबर लेखकाने आपले संपूर्ण नाव आणि पिनकोडसह पत्ता लिहावा. तसेच, संपर्क दूरध्वनी
क्रमांक, एस.टी.डी. कोडसहित द्यावा. शिवाय, इ-मेल संपर्क असल्यास, तो पत्ताही द्यावा. शीर्षकासह ही
सर्व माहिती पहिल्या पानावर लिहावी.

८) पारितोषिक न मिळालेले निबंध परत पाठविले जाणार नाहीत. (निबंधामध्ये चित्रे चिकटवू नयेत)

९) स्पर्धेसंबंधीचा अंतिम निर्णय मराठी विज्ञान परिषद, औरंगाबाद विभागाचा राहील.

१०) सर्व पारितोषिके आणि प्रमाणपत्रे पोस्टाने पाठवण्यात येतील.

११) स्पर्धेसाठी विस्तृत माहिती मराठी विज्ञान परिषद मध्यवर्ती कार्यालय, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२.

दूरध्वनी : २४०५४७१४/२४०५७२६८ येथे मिळेल.

इ-मेल: office@mavipa.org संकेतस्थळ: www.mavipa.org