वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धा (२०२४)

वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धा – २०२

कोणत्याही विषयावर निबंध लिहिण्यापूर्वी त्याविषयाचा अभ्यास करावा लागतो. त्याविषयाला अनुसरून उपलब्ध माहिती वाचावी लागाते. विषयाची मांडणी आकर्षक व परिणामकारक करणे हा निबंध लिखाणाचा महत्त्वाचा भाग आहे. मराठी विज्ञान परिषद १९६७ सालापासून निबंध स्पर्धेचे आयोजन करत आहे. १९८७ पासून ही स्पर्धा दोन गटात घेतली जाते. यावर्षीच्या दोन गटाचे विषय पुढीलप्रमाणे आहेत.

विद्यार्थी गट : विषय इ-कचरा 

गेल्या दोन-अडीच दशकात घनकचऱ्याच्या समस्येत इ-कचऱ्याची मोठी भर पडली आहे. उपलब्ध माहितीनुसार  सध्या भारतात २ कोटी मेट्रीक टन इ-कचरा निर्माण होत आहे. सगळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा सार्वत्रिक वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात होत असलेल्या संशोधनाचा परिपाक म्हणून आधीच्या पिढीची उपकरणे वापरातून बाद होऊन नवीन उपकरणे त्यांची जागा घेत आहेत. उपकरणे बाद होण्याचा कालावधीही खूप कमी आहे. यामुळे इ-कचऱ्याचे ढिगारे जमा व्हायला सुरूवात झाली आणि पाहता पाहता या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. या प्रश्नाची मोठी व्याप्ती लक्षात घेता समाजात याविषयीची जागरूकता खूप कमी आहे. यासाठी या प्रश्नाचा अभ्यास कसा होत आहे, हा कचरा पद्धतशीरपणे गोळा केला जातो का, सध्या त्यासाठी पुरेशा सोयी आहेत का, या कचऱ्यातले काही सुटे भाग पुनर्वापर करता येतील तर त्यासाठी सक्षम यंत्रणा आहे का, योग्य विल्हेवाट लावली नाही तर आपल्याला कोणता धोका आहे, पृथ्वीवर कोणतेही नवीन प्रदूषण निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षित विल्हेवाटीचा मार्ग कोणता, यामध्ये समाजाची, संस्थांची व उत्पादक कंपन्यांची जबाबदारी कोणती व ते घटक ती कशी सांभाळत आहेत याचा गोषवारा निबंधात अपेक्षित आहे.

खुला गट :  विषय – प्रकाश प्रदूषण

एलइडी दिव्यांच्या वापराद्वारे केल्या जाणाऱ्या रोषणाईचा आज सर्वत्र अतिरेक झाला आहे. त्याबरोबर विविध कार्यक्रमांच्या वेळी लेझर किरणांच्या झोताचाही वापर केला जातो. या सर्व प्रकाशाचा माणसासह सर्व सजीवांच्या जीवनक्रमावर अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो आहे. सदर निबंधात या परिणामांवर भाष्य हवे; तसेच या अतिरेकी वापरला आवर घालण्यासाठी विविध पातळीवर कोणकोणते उपाय योजता येतील, याचाही ऊहापोह केला जावा

(सूचना : छायाचित्रे, कात्रणे इत्यादींचा अंतर्भाव निबंधात करू नये.) तिन्ही स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी संपर्क : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२. दूरध्वनी : (०२२) ४८२६ ३७५० / ४८२६ ००९४.

 

स्पर्धेचे नियम :

१. महाराष्ट्राचे खालीलप्रमाणे पाच भौगोलिक विभाग आणि बृहन्महाराष्ट्राचा सहावा विभाग केला असून, विद्यार्थ्यांनी आणि खुल्या गटातील स्पर्धकांनी आपले निबंध खालीलप्रमाणे पाठवावेत. दिलेल्या पत्त्यावर निबंध पाठविण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट, २०२४ ही आहे.

२. विभाग १ : मुंबई शहर व कोकण विभाग
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांतील स्पर्धकांनी आपले निबंध, प्रा. डॉ. उमेश संकपाळ, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभाग, द्वारा रसायनशास्त्र विभाग, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी ४१५६१२ यांच्याकडे पाठवावेत.

विभाग २ : दक्षिण महाराष्ट्र विभाग
सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांतील स्पर्धकांनी आपले निबंध, डॉ. अंजली साळवी, अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, कोल्हापूर विभाग, डी, अमेय प्लाझा, ओपल हॉटेलमागे, कोल्हापूर, ४१६००५ येथे पाठवावेत.

विभाग ३ : उत्तर महाराष्ट्र विभाग
जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांतील स्पर्धकांनी आपले निबंध डॉ. राजेंद्र अहिरे, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, साक्री  विभाग, १२, प्रतीक, अकलाडे नगर, साक्री, जि. धुळे ४२४३०४ यांच्याकडे पाठवावेत.

विभाग ४ : मराठवाडा विभाग
औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, जालना, हिंगोली या जिल्ह्यांतील स्पर्धकांनी आपले निबंध श्री. सुधीर देशमुख, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, माजलगाव विभाग, रेणुका निवास, गजानन नगर, गजानन मंदिरामागे, माजलगाव, जि. बीड ४३११३१. यांच्याकडे पाठवावेत.

विभाग ५ : विदर्भ विभाग
चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, भंडारा, नागपूर, वर्धा, बुलढाणा, गडचिरोली, वाशिम, गोंदिया या जिल्ह्यांतील स्पर्धकांनी आपले निबंध प्रा. महादेव खाडे, अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, वणी विभाग, प्रगती नगर, वणी, जि. यवतमाळ ४४५३०४. यांच्याकडे पाठवावेत.

विभाग ६ : बृहन्महाराष्ट्र
महाराष्ट्राबाहेरील वडोदरा, गोवा, बेळगाव आणि निप्पाणी इत्यादी ठिकाणच्या स्पर्धकांनी आपले निबंध श्रीमती अंजली देसाई, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, गोवा विभाग, गोमंत विद्या निकेतन, आबाद फरीया रोड, मडगाव, गोवा ४०३६०१. यांच्याकडे पाठवावेत.

३. प्रत्येक भौगोलिक विभागातील शालेय गटासाठी पहिल्या व दुसऱ्या क्रमांकांच्या निबंधांना अनुक्रमे रु. ८००/- व रु. ४००/- तर खुल्या गटासाठी अनुक्रमे रु. १,०००/- व रु. ५००/- ची पारितोषिके दिली जातील. विभागाने निर्णय मध्यवर्तीस स्वतंत्रपणे कळविल्यावर पारितोषिकांची रक्कम थेट विजेत्यांना मध्यवर्तीकडून पाठविली जातील. विद्यार्थी गटाची पारितोषिके रमाकांत टिपणीस   स्मृतिप्रीत्यर्थ दिली जातात.

४. प्रत्येक भौगोलिक विभागातील दोन्ही गटांतील पहिले दोन निबंध अंतिम परीक्षणासाठी डॉ. रंजन गर्गे, अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, औरंगाबाद विभाग, विहंग, एन-३/४०६, सिडको, औरंगाबाद ४३१००३ येथे ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत पाठवावेत. निरनिराळ्या भौगोलिक विभागांकडून आलेल्या निबंधांचे परीक्षण राज्यस्तरावर पुन्हा स्वतंत्रपणे होईल. त्यांतील पहिल्या दोन क्रमांकांना खुल्या गटासाठी अनुक्रमे रु. २,५००/- आणि रु. २,०००/-, विद्यार्थी गटासाठी अनुक्रमे रु. २,०००/- आणि रु. १,५००/- अशी पारितोषिके दिली जातील.

५. स्पर्धेत त्या-त्या ठिकाणी उल्लेख केलेल्या गटांच्या पातळीप्रमाणे कोणासही भाग घेता येईल. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नाही. निबंध कागदाच्या एका बाजूस सुवाच्य अक्षरात लिहावा. मात्र, ज्या व्यक्तीस निबंध स्पर्धेत दोनदा पारितोषिके मिळाली आहेत, त्याने परत भाग घेऊ नये.

६. शब्दसंख्या १५०० ते २००० असावी. लिखाण कागदाच्या एकाच बाजूला असावे. स्वहस्ताक्षरात असल्यास उत्तम. कागद ए-४  आकाराचा असावा.

७. साहित्याबरोबर लेखकाने आपले नाव व पिनकोडसह संपूर्ण पत्ता द्यावा. संपर्क भ्रमणध्वनी द्यावा. तसेच, इ-मेल पत्ता कळवावा. शीर्षकासह ही सर्व माहिती पहिल्या पानावर लिहावी.

८. पारितोषिक न मिळालेले निबंध परत पाठविले जाणार नाहीत. (निबंधामध्ये चित्रे चिकटवू नयेत)

९. स्पर्धेसंबंधीचा अंतिम निर्णय मराठी विज्ञान परिषद, औरंगाबाद विभागाचा राहील.

१०. सर्व पारितोषिके आणि प्रमाणपत्रे पोस्टाने पाठवण्यात येतील.

११. स्पर्धेसाठी विस्तृत माहिती मराठी विज्ञान परिषद मध्यवर्ती कार्यालय, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२. दूरध्वनी : (०२२) – ४८२६ ३७५० / ४८२६ ००९४ येथे मिळेल.

इ-मेल : office@mavipa.org <संकेतस्थळ : www.mavipa.org

माहिती पीडीएफ फाईल