विज्ञान अनुभूती शिबिर / Vidnyan Anubhuti Camp

विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती जागृत करणे, विज्ञानाचा व्यावहारीक वापर करण्यास उद्युक्त करणे आणि वैज्ञानिकांची भावी पिढी उभी करण्यास पूरक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेने विज्ञान अनुभूती या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित दि. ८ ते १३ मे, २०२४ या कालावधीत प्रात्याक्षिके व प्रयोगांच्या शिबिराचे आयोजन केले आहे.

रोज विज्ञानातील एका विषयावर (प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित) प्रयोग विद्यार्थांना करायला दिले जातील.  प्रत्येक विद्यार्थ्याला प्रयोग व प्रारूपे करण्याची संधी मिळेल. त्यांनी  तयार केलेले प्रारूप त्यांना घरी न्यायला दिले जाईल. रविवार, दि. १२ मे २०२४ रोजी मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर विज्ञानाच्या वरील सर्व शाखांमधील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली आहेत. शिबिरास नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी हे सत्र नि:शुल्क खुले असेल. जागा मर्यादित आहेत. कृपया त्वरित नाव नोंदणी करा.

एक-दोन दिवसांकरिता सहभागी होण्यासाठी कृपया दिलेल्या दूरध्वनीद्वारे कार्यालयाकडे संपर्क साधावा.

टीप: हे शिबिर इंग्रजीतून घेण्यात येईल. मराठी माध्यमाचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

कालावधी :    ८ मे ते १३ मे २०२४
वेळ          :    सकाळी ११ ते दुपारी ४.३०
वयोमर्यादा :    इयत्ता ८वी पास ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी
शुल्क       :    रु. ३०००/- प्रति विद्यार्थी  

दि.  ८ मे, २०२४ – विषय : प्राणिशास्त्र
दि.  ९ मे, २०२४ – विषय : वनस्पतीशास्त्र
दि. १० मे, २०२४ – विषय : रसायनशास्त्र
दि. ११ मे, २०२४ – विषय : भौतिकशास्त्र
दि. १२ मे, २०२४ – मार्गदर्शन विषय : मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी
दि. १३ मे, २०२४ – विषय : गणित

स्थळ: मराठी विज्ञान परिषद
विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
मेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org

दूरध्वनी : (०२२) ४८२६००९४ / ३७५० (मंगळवारी कार्यालय बंद)
मोबाईल : ९९६९१००९६१ (वेळ : सकाळी १०:३० ते सायंकाळी ५)
९९६९०५२१२२(शुभदा वक्टे)    

सोबतचा अर्ज भरून नाव नोंदणी व शुल्क भरणा करावा.

VIDNYAN ANUBHUTI CAMP 

To nurture budding young scientists and to experience the applied aspects of the science; Marathi Vidnyan Parishad has organised VIDNYAN ANUBHUTI, an application based science activity camp during 8th May 2024 to 13th May 2024.

Everyday different experiments on a science subject: Zoology, Botany, Chemistry, Physics and Mathematics. Every student will have opportunity to perform experiments and models. Students will carry models made by them. On Sunday, 12th May 2024 experts lecture on ‘Opportunities of higher education in basic sciences’ of all above science subjects. This session can be attended by parents of the workshop seekers free of cost. Seats are limited, so register you name as early as possible.

Those who wants to participate one/two days, please contact at office on given telephone numbers.

Note: Workshop will be conducted in English. Students of Marathi medium can participate it.

Duration             :      8th to 13th May 2024
Time                    :      11 am to 4.30 pm
Criteria                :      8th passed to 12th grade students
Fees                     :      Rs. 3000/- per student

8th May, 2024 – Sub.: Zoology
9th May, 2024 – Sub.: Botany
10th May, 2024 – Sub.: Chemistry
11th May, 2024 – Sub.: Physics
12th May, 2024 – Sub.: Guidance on the opportunities of higher education in basic sciences
13th May, 2024 – Sub.: Mathematics

Venue: Marathi Vidnyan Parishad
Vidnyan Bhavan, V.N. Purav marg,
Sion-Chunabhatti (E), Mumbai 400 022.
Email: office@mavipa.org Website: www.mavipa.org

Phone: (022) 48260094 / 3750 (Tuesday weekly off)
Mob : 9969100961(10:30 am to 5:30 pm)
9969052122 (Shubhada Vakte)

Fill the form for Registration & pay the fees.