विज्ञान अनुभूती शिबिर (VIDNYAN ANUBHUTI CAMP)

Are you ready to ignite your curiosity and dive into the fascinating world of science and research? The Marathi Vidnyan Parishad is thrilled to present the ‘Vidnyan Anubhuti’ camp—a unique opportunity to immerse yourself in the wonders of science, gain hands-on experience, and set foot on the path of discovery.
Taking place from 7th May 2025 to 10th May 2025, this camp is specially designed to nurture the next generation of scientists. Through interactive demonstrations and captivating experiments, participants will not only learn but truly experience the magic of science in action!

Background:

Each day of the camp is dedicated to a specific subject—Mathematics, Biology, Chemistry, and Physics—featuring insightful lectures and demonstrations by esteemed experts in these fields. But that’s not all! Students will spend half the day engaging in exciting, hands-on experiments and activities.
To inspire budding researchers, the experts will share real-world insights from their own Ph.D. studies and ongoing research. This includes an introduction to the challenges of scientific exploration, the value of impactful research, and what it takes to make meaningful contributions to the scientific community.
As a special highlight, students will tackle intriguing science problems and design their own experiments, unleashing their creativity and critical thinking.
To give students an introduction to research, they will be given various science problems, and they will design their own experiments to solve these problems. Seats are limited, so please register your name as soon as possible.

Camp Details:

  • Duration       : 7th to 10th May 2025
  • Time               : 11:00 am to 4:30 pm
  • Eligibility      : Students from Grades/Standards 8 to 11
  • Fees                : Rs. 2000/- per student

 Expert Sessions:

  • 7th May 2025 : Subject – Mathematics, Expert: Dr. Rachna Desai (Associate Professor, K J Somaiya, School of Engineering, Vidyavihar)
  • 8th May 2025 : Subject – Biology, Expert: Dr. Rajani Bhisey (Retired cancer researcher)
  • 9th May 2025 : Subject – Chemistry, Expert: Dr. Anant Kapdi (Professor/Researcher, Institute of Chemical Technology, Mumbai)
  • 10th May 2025 : Subject – Physics, Expert: Dr. Amol Dighe (Senior Researcher, Tata Institute of Fundamental Research, Mumbai)

 Important Notes:

  • The workshop will be conducted in English, but students from Marathi medium schools are welcome to participate.
  • Seats are limited, so early registration is advised.
  • If you wish to participate for one or two days, please contact the office using the provided telephone numbers.
  • Participants should bring pen, notebook, tiffin and water bottle.
  • Do not miss this exciting opportunity to engage with science and research. Register today!

How to Register: Pay the fees to confirm your participation.

Pay Fees Here

Venue: Marathi Vidnyan Parishad
Vidnyan Bhavan, V.N. Purav marg,
Sion-Chunabhatti (E), Mumbai 400 022.
Email: office@mavipa.org
Website: www.mavipa.org
Phone: (022) 48260094 / 3750
Mob : 9969100961, 9969052122 (Shubhada Vakte)
(Call between 10:30 am to 5:30 pm, except on Tuesday)


विज्ञान अनुभूती शिबिर

विज्ञान आणि संशोधनाच्या अद्भूत जगाबाबत कुतूहल जागवण्यासा।ठी आणि त्यात प्रवेश करण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का?  स्वत: हाताने प्रयोग व कृती करणे, विज्ञानात मग्न होणे, याचबरोबर संशोधनाच्या मार्गावर पाऊल ठेवण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेने विज्ञान अनुभूती शिबिराचे आयोजन केले आहे.

वैज्ञानिकांची भावी पिढी उभी करण्यास पूरक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ७ मे २०२५ ते १० मे २०२५ या कालावधीत हे शिबिराचे संपन्न होणार आहे. संवादात्मक प्रात्याक्षिके व आकर्षक प्रयोगांद्वारे कृतियुक्त शिक्षणाबरोबर विद्यार्थी विज्ञान अनुभवतील.

पार्श्वभूमी:

विज्ञानातील एका विषयावर (गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र)  त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनपर व्याख्यान किंवा प्रात्यक्षिक  प्रत्येक दिवशी असेल. याचबरोबर दिवसातील किमान निम्मा वेळ त्यांना त्या विषयावर आधारित प्रयोग किंवा कृती स्वत: करण्याची संधी मिळेल.  विद्यार्थ्यांनी भविष्यात संशोधनाकडे वळावे यासाठी या कार्यक्रमामध्ये तज्ज्ञ स्वत:च्या पीएच.डीच्या संशोधनाबाबत किंवा सध्या करत असलेल्या संशोधनाबाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती देतील. त्यांना भविष्यात संशोधन करण्यास प्रोत्साहित करतील. यातून संशोधन कसे चालते, ते कसे असावे, कोणते संशोधन मान्यता पावते, यात काय अडचणी येतात या विषयी त्यांना माहिती मिळावी ही अपेक्षा आहे.

विद्यार्थ्यांना संशोधनाची तोंड ओळख व्हावी या उद्देशाने त्यांना  विज्ञानातील विविध समस्या दिल्या जातील, आणि या समस्या सोडवण्यासाठी ते स्वत:चे प्रयोग स्वत: तयार करून समस्या सोडवतील. जागा मर्यादित आहेत. कृपया त्वरित नाव नोंदणी करा.

 शिबिर तपशील:

  • कालावधी    : ७ मे ते १० मे २०२५
  • वेळ             : सकाळी ११ ते दुपारी ४.३०
  • वयोमर्यादा   : इयत्ता ८वी  ते ११वी च्या विद्यार्थ्यांसाठी
  • शुल्क           : रु. २०००/- प्रति विद्यार्थी  

तज्ज्ञांची सत्रे:

  • दि. ७ मे, २०२५ : विषय –  गणित, तज्ज्ञ – डॉ. रचना देसाई (सहयोगी प्राध्यापक, के जे सोमय्या अभियांत्रिकी विद्यालय, विद्याविहार)
  • दि. ८ मे, २०२५ : विषय – जीवशास्त्र,  तज्ज्ञ – डॉ. रजनी भिसे (निवृत्त कर्करोग संशोधक)
  • दि. ९ मे, २०२५ : विषय –  रसायनशास्त्र,  तज्ज्ञ – डॉ. अनंत कापडी (प्राध्यापक/संशोधक, रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई)
  • दि. १० मे, २०२५ : विषय – भौतिकशास्त्र, तज्ज्ञ – डॉ. अमोल दिघे (ज्येष्ठ संशोधक, टाटा मूलभूत संशोधन संस्था)

 महत्त्वाची टीप:

  • हे शिबिर इंग्रजीतून घेण्यात येईल. मराठी माध्यमाचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
  • जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी करावी.
  • एक-दोन दिवसांकरिता सहभागी होण्यासाठी कृपया दिलेल्या दूरध्वनीद्वारे कार्यालयाकडे संपर्क साधावा.
  • सहभागी विद्यार्थ्यांनी पेन, वही, जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली आणावी.
  • विज्ञान संशोधन जाणून घेण्याची आणि त्यात सहभागी होण्याची संधी गमावू नका, आजच नावा नोंदणी करा.

 नाव नोंदणी कशी कराल: शुल्क भरणा करून नाव नोंदणी करावी.

येथे शुल्क भरणा करा

स्थळ: मराठी विज्ञान परिषद
विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
मेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org
दूरध्वनी : (०२२) ४८२६००९४ / ३७५०
मोबाईल : ९९६९१००९६१,  ९९६९०५२१२२(शुभदा वक्टे)  
(वेळ : मंगळवार व्यतिरिक्त सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:३०)