विज्ञान दर्पण २०२५ – विशेष व्याख्यान व सन्मान सोहळा

मराठी विज्ञान परिषद आयोजित करत आहे विज्ञान दर्पण २०२५ – एक प्रेरणादायी कार्यक्रम ज्यात विज्ञानाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग आहे.

दिनांक: रविवार, २४ ऑगस्ट २०२५ – वेळ: सकाळी १० ते दुपारी १
प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य व खुला

 प्रमुख आकर्षण:

  • सदीप व्याख्यान:
    ‘अंतराळ २०२५’ विषयावर जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद काळे यांचे सखोल विवेचन
  • सन्मान्य सभासदत्व प्रदान:
    खालील मान्यवरांना मविप सन्मान्य सभासदत्व बहाल करण्यात येईल:

    • डॉ. शरद चाफेकर (पर्यावरण)
    • डॉ. रजनी भिसे (कर्करोग संशोधन)
    • डॉ. प्रमोद काळे (अवकाश)
    • डॉ. अरविंद कुमार (विज्ञान शिक्षण)
    • डॉ. हेमंत व अर्चना जोशी (आरोग्य)
    • जयंत एरंडे (विज्ञान प्रसार)
    • डॉ. रवींद्र कुलकर्णी (संशोधन)
  • पारितोषिक वितरण:
    • वैद्यक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पारितोषिके
    • प्रा. श्री. ना. गोडबोले गणित पारितोषिक वितरण

स्थळ: मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२
संपर्क: ९९६९१००९६१

सर्व  विज्ञानप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून ज्ञानवृद्धीचा लाभ घ्यावा. मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान प्रसाराच्या कार्यात आपला सहभाग निश्चित करा!