विज्ञान दर्पण – २७ ऑगस्ट २०२३

पार्श्वभूमी : मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक सभेला जोडून सकाळच्या सत्रात ‘मला आवडलेले पुस्तक’ कार्यक्रम (१९९१ पासून) सलग २५ वर्षे आयोजित केला गेला. सन २०१७मध्ये त्यात बदल करून ‘विज्ञान दर्पण’ या शीर्षकाखाली एका वेगळ्या कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यामध्ये दरवर्षी एक विषय (मुलभूत अथवा प्रासंगिक) निवडून कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यापूर्वी सायबर गुन्हेगारी, जल, आवर्त सारणी, रस्ते वाहतूक, हवामान बदल या विषयांचा समावेश होता.

दि. २७ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित केलेल्या ‘विज्ञान दर्पण’ या कार्यक्रमात ‘काश्मीर रेल्वे’ या विषयावर डॉ. केतन गोखले, (व्यवस्थापकीय संचालक- निवृत्त, कोकण रेल्वे) सदीप व्याख्यान देतील. तसेच श्री. मिलिंद काळे (ज्येष्ठ रेल्वे अभियंता) ‘वंदे भारत एक्सप्रेस’ या विषयी व्याख्यान देतील. याच कार्यक्रमात माध्यमिक शालांत परिक्षेत ‘गणित’ विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या तीन शाळांतील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा ‘प्रा. श्रीधर नारायण गोडबोले पारितोषिक’ देऊन गौरवण्यात येतो.

Topic: विज्ञान दर्पण कार्यक्रम – दि. २७ ऑगस्ट, २०२३

Time: Aug 27, 2023 10:00 AM India

Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/85468194033?pwd=SWcrMTNuVEdQd0J6elVpTERTczBFZz09

Meeting ID: 854 6819 4033
Passcode: 2708

‘विज्ञान दर्पण’ कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.