विज्ञान खेळणी महोत्सव  

मराठी  विज्ञान परिषद आणि श्री उद्यान  गणेश सेवा समिती शिवाजी पार्क दादर  यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी विज्ञान खेळणी महोत्सवाचे आयोजन केले आहे.  श्री उद्यान गणेश सेवा समिती, शिवाजी पार्क दादर येथे सकाळी ९:३० ते २:००  या वेळात हा महोत्सव संपन्न होईल.

या महोत्सवात हवा, ध्वनी, गुरूत्वमध्य या आणि इतर संकल्पनांवर आधारित खेळण्याबरोबर विद्यार्थ्यांना खेळता येईल. या  महोत्सवात विज्ञान खेळणी संच आणि  वैज्ञानिक पुस्तकांचा स्टॉल देखील असेल. या स्टॉलवरून पुस्तके, वैज्ञानिक खेळणी संच  विकत घेता येईल.