मराठी विज्ञानविषयक व्यंगचित्र स्पर्धा २०२४

मराठी विज्ञान परिषद आणि कार्टूनिस्ट कम्बाईन संयुक्त विद्यमाने आयोजित

मराठी विज्ञानविषयक व्यंगचित्र स्पर्धा २०२४

एक चित्र हे हजार शब्दांची बरोबरी करते, अशा अर्थाची इंग्रजीत म्हण आहे. काही कल्पना तर चित्रातच मांडाव्या लागतात, कारण शब्द अपुरे पडतात. अशा चित्रांचा एक वर्ग म्हणजे व्यंगचित्रे, ज्यात रेखाचित्रे / अर्कचित्रे देखील समाविष्ट आहेत. दैनंदिन जीवनात आढळणारा विरोधाभास, समस्या, प्रसंग किंवा बातमी दाखवून व्यंगचित्रे महत्वाचा आशय रंजकपणे पोहचवतात. विज्ञानाचे क्षेत्र याला अपवाद नाही. परंतु, या माध्यमाचा वापर विज्ञान किंवा वैज्ञानिक यांच्या संबंधातील विनोद, विसंगती दाखवण्यासाठी मराठी भाषा वापरून फारसा होताना दिसत नाही.

हे माध्यम विज्ञानावर विचार करण्यासाठी विकसित व्हावे, तसेच त्याच्या साहाय्याने विज्ञान मनोरंजक पद्धतीने मांडले जावे, यासाठी मराठी विज्ञान परिषद आणि  कार्टूनिस्ट कम्बाईन, मराठी विज्ञानविषयक व्यंगचित्र स्पर्धा आयोजित करत आहे. तीन सर्वोत्तम व्यंगचित्रांना अनुक्रमे रुपये ५,०००/-, ४,०००/- आणि ,५००/- अशी पारितोषिके दिली जातील. विजेती व्यंगचित्रे मराठी विज्ञान परिषद पत्रिकेच्या दिवाळी अंकामध्ये छापली जातील. तसेच उत्तेजनार्थ व्यंगचित्रांना प्रमाणपत्रेही दिली जातील.

स्पर्धेच्या अटी व नियम :

  • व्यंगचित्र / रेखाचित्र विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, वैज्ञानिक या विषयांवर असणे आवश्यक आहे.
  • व्यंगचित्र / रेखाचित्र स्वतंत्र आणि नवे (ओरिजिनल) असणे आवश्यक. नक्कल केलेले किंवा दुसऱ्या कोणा चित्राशी बरेच साम्य असलेले चित्र बाद होईल.
  • कोणत्याही समाज, समुदाय, संस्कृति, धर्म, नागरिकता, शारीरिक व्यंग यांच्याबाबत अपमानकारक संदर्भ किंवा आशय असे आढळल्यास चित्र स्पर्धेतून बाद होईल.
  • एका स्पर्धकाला दोनहून अधिक व्यंगचित्रे सादर करता येणार नाहीत. पारितोषिक केवळ एकाला दिले जाईल.
  • निवड करताना एकसमानता असावी म्हणून हाताने काढलेली अथवा संगणकावर काढलेली किंवा रुपांतरीत केलेली
  • अंकीय चित्रे देखील ए-४ आकाराच्या पांढऱ्या कागदावर मुद्रित पाठवावी. व्यंगचित्र कृष्णधवल किंवा रंगीत असू शकतील.
  • केवळ ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत प्राप्त झालेल्या व्यंगचित्रांचा विचार केला जाईल.

व्यंगचित्र पाठवण्याचा पत्ता :
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२.
इ-मेल : patrika@mavipa.org

  • परिषदेने नेमलेल्या परीक्षकांचा निर्णय अंतिम मानला जाईल.
  • पारितोषिकासाठी निवड न झालेली पण अर्थपूर्ण असलेली चित्रे पत्रिकेत छापण्याचा विचार होऊ शकतो. तसे झाल्यास,
  • व्यंगचित्र प्रसिद्ध झालेल्या पत्रिकेचा अंक संबधित चित्रकाराला पाठविण्यात येईल. तथापि या स्पर्धेकरिता सादर केलेल्या
  • सगळ्या व्यंगचित्रांवर, मराठी विज्ञान परिषदेचा अधिकार राहील.
  • या स्पर्धेकरिता दोन परीक्षकांची नेमणूक केली जाईल आणि त्यापैकी एक शास्त्रज्ञ व दुसरा व्यंगचित्रकार असेल.