Young Scientist Course (Online)
Considering the impact of science & technology in daily life, while teaching with day to day examples, students can understand science subject easily and remember it for long time. Logical thinking skill can be developed through the learning science, which is useful in daily life and for competitive exams. Marathi Vidnyan Parishad is offering an Online Young Scientist Course on Google Meet on the demand of parents and students. This course aims to provide students with strong foundation in science concepts & theories and guidance for preparation of Dr. Homi Bhabha Competition Written Examination 2025. This course is also helpful for other exams like CV Raman, Talent Search Exam, National Talent Search Exam, and National Science Olympiad.
Course Goals:
- To help the students to understand basic science concepts thoroughly. Encourage curiosity and critical thinking among students.
- To develop logical thinking and a scientific mindset and broaden students understanding.
- To guide the students for preparation of Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Competition written exam and motivate students to pursue careers in science & research.
Course Details:
- Eligibility: Grade 5 students (SSC, CBSE, ICSE, IB, Other state boards)
- Duration: 30 Sundays, 11am to 1pm (From January to October 2025)
- Medium: English
- Fees: Rs. 6000/- per student
- Topics Covered: Physics, Chemistry, Biology, and General Science topics are measurement, volume, mass, density, speed, motion, force, energy, electricity, sound, light, heat, matter and its properties, chemical reactions, living things, cells and tissues, plants, human systems, natural resources, diseases, food safety, disaster management,
- Study material (ppt, notes, MCQs question papers) will share on Google drive to students.
- Students who registered this course, will get 25% concession in practical workshops which will be arranged after the result of Homi Bhabha Balvaidnyanik Competition’s written exam.
- The student who wants Young Scientist Course in Marathi Medium, please contact to Marathi Vidnyan Parishad’s office.
Students who complete the course will get a certificate.
विज्ञान-तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत विज्ञान विषय शिकवल्यास विद्यार्थ्यांना त्याचे सहजरित्या आकलन होऊन त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहते. विज्ञान शिक्षणातून विद्यार्थ्यांचे तार्किक कौशल्य विकसित केल्यास ते त्यांना नेहमीच्या जीवनात आणि वेगवेगळ्या स्पर्धांसाठी उपयुक्त ठरते. पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मराठी परिषद परिषदेने ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी गुगल मीटवर ‘बालवैज्ञानिक अभ्यासक्रमाचे’ आयोजन केले आहे. विज्ञान संकल्पनांचा पाया मजबूत करून ‘डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२५’साठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि परीक्षेकरिता त्यांची तयारी करून घेणे हे या बालवैज्ञानिक अभ्यासक्रमाचे उद्देश आहेत. सी.व्ही.रामन, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, राष्ट्रीय विज्ञान ऑलिंपियाड, इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठीसुद्धा हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे.
अभ्यासक्रमाचे उद्देश:
- विद्यार्थ्यांना विज्ञानातील पायाभूत संकल्पनाचे आकलन सविस्तर होण्यास मदत करणे. विद्यार्थ्यांमधील चौकसबुद्धीला आणि विवेचनात्मक विचारांना प्रोत्साहन देणे.
- विद्यार्थ्यांचा तार्किक विचार कौशल्य आणि वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे.
- डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेच्या लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांची तयारी करून घेणे.
अभ्यासक्रमाचा तपशील:
- पात्रता : इयता ५वीचे विद्यार्थी (महाराष्ट्र बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई, आयबी, इतर राज्यांचे बोर्ड)
- कालावधी : ३० रविवार, सकाळी ११ ते दुपारी १ (जानेवारी ते ऑक्टोबर २०२५)
- माध्यम : इंग्रजी
- शुल्क : ₹ ६०००/- प्रति विद्यार्थी
- समाविष्ट विषय : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि सामान्य विज्ञान या विषयांतील उपविषय पुढीलप्रमाणे : मोजमापन, आकारमान, वस्तुमान, घनता, चाल, गती, बल, ऊर्जा, विद्युत, ध्वनी, प्रकाश, उष्णता, पदार्थांचे गुणधर्म, रासायनिक अभिक्रिया, सजीव, पेशी आणि ऊती, वनस्पती, मानवी शरीरातील संस्था, नैसर्गिक साधनसंपत्ती, रोग, अन्न सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, इत्यादी.
- विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य (विषयांच्या पीपीटी, नोट्स, बहुपर्यायी प्रश्न) गुगल ड्राईव्हवर सामायिक केले जाईल.
- या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना ‘बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळेसाठी’ २५% सवलत दिली जाईल.
- बालवैज्ञानिक अभ्यासक्रम मराठी माध्यमातून हवे असल्यास मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.