Young scientist practical workshop / बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळा

Workshops for grades 6 & 9 students:

Background: Even though there are laboratories exist in schools, students hardly get an opportunity to perform experiments themselves. If experiments are added to science education, students will understand and remember it for a long time and clear their science concepts in a better way. Marathi Vidnyan Parishad started conducting special Young Scientist Practical Workshops from the year 2000 to provide guidance and practice of experiments for Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Practical Competition on the demand of parents and students. These experiment workshops are also useful for other competitive exams.

Young Scientist Practical Workshops have been organized separately for the students of grade 6 and grade 9 which are mainly attended by students appearing for the above examination, but students from grade 5 to grade 9 can participate it. These workshops include some experiments based on school curriculum and others are supportive to it. These hands-on workshops can make students more interested in science and attract more towards science

Grade 6 students get hands-on experience of 35 experiments (Chemistry-7, Physics-7, General Science-7, Botany-7 & Zoology-7). Module I and II contain different experiments. There are separate batches for module I and II.

Every student of grade 9 gets hands-on experience of 22 experiments (Chemistry-11, Physics-11) and observations of 30 biological specimens.

Every student gets a workbook to write observations, conclusions & answers for each experiment which can be taken home. Expected answers also included in workbook. These workshops include mock test. Grades 5 & 7 students can participate in workshops of grade 6 and grade 8 students can participate in workshops of grade 9. Fees of one day workshop for grades 6 and 9 students is Rs. 2000/- per day.

Grade 6:
Duration: 11 am to 5 pm – 6 hours
Fees: 2000/- per day
Medium: Marathi & English
No of Experiments: 35 (Chemistry-7, Physics-7, General Science-7, Botany-7 & Zoology-7).
Subjects: Chemistry, Physics, General Science, Botany & Zoology.

Grade 9:
Duration: 11 am to 5 pm – 6 hours
Fees: 2000/- per day
Medium: Marathi & English
No of Experiments: 22 experiments (Chemistry-11, Physics-11) & 30 biological specimens for observation
Subjects: Chemistry, Physics, Biology

Venue : Marathi Vidnyan Parishad, Vidnyan Bhavan, V. P. Purav Marg, Sion-Chunabhatti (E), Mumbai 400022

Contact: (022) 48260094 / 3750  Mobile: 9969100961, 9969052122 (Shubhada Vakte) (except Tuesdays 10:30 am to 5:30 pm).

Email Id: office@mavipa.org, Website: www.mavipa.org

 


इयत्ता ६वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा:

पार्श्वभूमी : शाळांमध्ये प्रयोगशाळा अस्तित्वात असल्या तरीही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी मिळतेच असे नाही. विज्ञान शिक्षणाला प्रयोगांची जोड दिल्यास विद्यार्थ्यांच्या ते दीर्घकाळ लक्षात राहते व विज्ञान संकल्पनांचे आकलन अधिक  चांगल्यारितीने होते. शालेय विज्ञान शिकताना विद्यार्थ्यांना मदत व्हावी तसेच डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक प्रयोग प्रात्यक्षिक स्पर्धा परीक्षेसाठी  प्रयोगांसंदर्भात मार्गदर्शन व सराव मिळावा म्हणून परिषदेने, पालक आणि विद्यार्थ्यांच्या  मागणीनुसार २००० सालापासून विशेष बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळाघ्यायला सुरुवात केली. या प्रयोग कार्यशाळा इतर स्पर्धांसाठी उपयुक्त आहेत.

या उपक्रमाद्वारे इयत्ता ६वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळा’ स्वतंत्रपणे आयोजित केल्या आहेत. या प्रयोग कार्यशाळेत मुख्यत्वे उपरोक्त परीक्षेला बसणारे विद्यार्थी सहभागी होत असले तरी, इयत्ता ५वी ते ९वी चे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. या कार्यशाळेत घेतले जाणारे प्रयोग काही शालेय अभ्यासक्रमातील तर काही शालेय विज्ञान अभ्यासक्रमाला पूरक असतात. या सराव कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची रुची निर्माण होऊन ते विज्ञान विषयाकडे अधिक आकर्षित होऊ शकतात

या कार्यशाळेत इयत्ता ६वीचा प्रत्येक विद्यार्थी ३५ प्रयोग (रसायनशास्त्र-७ प्रयोग, भौतिकशास्त्र-७, सामान्य विज्ञान-७, वनस्पतीशास्त्र-७, प्राणीशास्त्र-७) स्वत:च्या हाताने करतो. मॉड्युल I आणि II मध्ये वेगवेगळ्या प्रयोगांचा समावेश असून यांसाठी स्वतंत्र कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

या कार्यशाळेत इयत्ता ९वीचा प्रत्येक विद्यार्थी २२ प्रयोग (रसायनशास्त्र-११, भौतिकशास्त्र-११) आणि जीवशास्त्राचे ३० नमुन्यांचे निरीक्षण स्वत:च्या हाताने करतो.

कार्यशाळेत जे करवून प्रयोग घेतले जातात त्यांची निरीक्षण-नोंद पुस्तिका अपेक्षित उत्तरांसह विद्यार्थ्याला घरी न्यायला दिली जाते. या नोंद पुस्तिकेत विद्यार्थी दिवसभरात केलेल्या प्रयोग निरीक्षणांच्या नोंदी करतो. या कार्यशाळेमध्ये सराव परीक्षेचा समावेश केलेला आहे. इ. ५वी आणि ७वीचे  विद्यार्थी इ.६वीच्या बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळेत सहभागी होऊ  शकतात. तसेच इ. ८वीचे  विद्यार्थी ९वीच्या बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात.  इ.६वी आणि ९वीच्या एका दिवसाच्या कार्यशाळेचे शुल्क रु. २०००/- आहे.

इयत्ता ६वी:
कालावधी: सकाळी ११ ते संध्या. ५ – एकूण ६ तास
शुल्क: रु. २०००/- दर दिवसाला
माध्यम : मराठी आणि इंग्रजी
प्रयोगांची  संख्या : ३५ (रसायनशास्त्र-७, भौतिकशास्त्र-७, सामान्य विज्ञान-७, वनस्पतीशास्त्र-७,  आणि प्राणीशास्त्र-७)
विषय: रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, सामान्य विज्ञान, वनस्पतीशास्त्र आणि  प्राणीशास्त्र

इयत्ता ९वी:
कालावधी: सकाळी ११ ते संध्या. ५ – एकूण ६ तास
शुल्क: रु. २०००/- दर दिवसाला
माध्यम : मराठी आणि इंग्रजी
प्रयोगांची  संख्या : प्रयोग २२ (रसायनशास्त्र-११, भौतिकशास्त्र-११) आणि जीवशास्त्रातील ३० नमुने निरीक्षणासाठी
विषय: (रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र)

स्थळ : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पू), मुबंई ४०००२२.

संपर्क : (०२२) ४८२६००९४ / ३७५० मोबाईल : ९९६९१००९६१, ९९६९०५२१२२ (शुभदा वक्टे) (मंगळवार व्यतिरिक्त स.१०:३० ते सा. ५:३०)

Email Id : office@mavipa.org, Website : www.mavipa.org