Articles by IT Head
१६-४-२०२५ | भूजलाची गुणवत्ता
भूजलाचा अनिर्बंध उपसा हा एक जटिल प्रश्न होऊन बसलेला असतानाच भूजलाची खालावणारी गुणवत्ता ही देखील एक गंभीर समस्या ठरत आहे. मानवी हस्तक्षेप हे यामागचे प्रमुख कारण आहे. भूजलाची गुणवत्ता अनेक घटकांवर अवलंबून असते; उदाहरणार्थ पाण्याचा […]
१५-४-२०२५ | खडकांची पारगम्यता
एखाद्या खडकात भूजल अथवा पेट्रोलियम साठण्यासाठी तो खडक केवळ सच्छिद्र असणे पुरेसे नसते. तर त्या खडकातल्या पोकळ्यांमधून पाणी अथवा पेट्रोलियम इकडून तिकडे वहात जाणेही तितकेच गरजेचे असते. एखाद्या जलधारक खडकाच्या ठराविक दाबाखाली पाणी वाहून नेण्याच्या […]
१४-४-२०२५ | खडकांमधली सच्छिद्रता
खडकांमधल्या खनिजांच्या कणांमधे ज्या मोकळ्या जागा असतात, त्यांच्यामुळे खडकांमधे सच्छिद्रता निर्माण होते. सच्छिद्रता हा खडकाचा मूलभूत गुणधर्म असून खडकांमधे भूजलाचे आणि पेट्रोलियमचे साठे निर्माण होण्यामधे त्यांची महत्त्वाची भूमिका असते. खडकाच्या एकूण आकारमानाशी खडकातल्या सर्व पोकळ्यांच्या […]
११-४-२०२५ | लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन
लोकसंख्येत होणारी अफाट वाढ आणि त्याच वेळी वेगाने घटणारे गोड्या पाण्याचे स्रोत या परिस्थितीमुळे लोक आता भूजलाकडे वळले आहेत. भूजलाचा वापर करताना नियोजनाचा पूर्ण अभाव दिसून येत आहे, आणि उपसा मात्र प्रचंड वाढत आहे. त्यातून […]
१०-४-२०२५ | महाराष्ट्र जलधोरण २०१९
पाण्याची उपलब्धता व त्यावरील ताण लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांचे व भूजलाचे योग्य व्यवस्थापन व नियमन आवश्यक ठरते. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक कायदे केले आहेत. महाराष्ट्राचे अलिकडचे जलधोरण २०१९ साली अस्तित्वात आले. पाण्याची मागणी व पुरवठा […]
९-४-२०२५ | कॅल्साइटपासून केला निकोलचा लोलक
विल्यम निकोल यांनी कॅल्साइट या खनिजाचा पारदर्शक स्फटिक वापरून १८२८ मधे एक अत्यंत उपयुक्त प्रकाशीय उपकरण विकसित केले. त्याला निकोलचा लोलक (निकोल्स प्रिझम) असे म्हणतात. जे प्रकाशकिरण प्रकाशलहरींच्या स्वरूपात पुढे जाताना त्यांच्यातली विद्युतचुंबकीय आंदोलने एकाच […]
८-४-२०२५ | दोन प्रतिमा दाखवणारे अद्भुत् खनिज
कॅल्साइट हे पृथ्वीवर सर्वत्र आढळणारे एक खनिज असून त्याचे रासायनिक संघटन (केमिकल कॉम्पोजिशन) आहे कॅल्शियम कार्बोनेट. या खनिजाचे एक खास वैशिष्ट्य आहे. याचा जर उत्कृष्ट दर्जाचा पारदर्शक स्फटिक घेऊन कागदावरच्या एखाद्या ठिपक्यावर ठेवला, तर वरून […]
७-४-२०२५ | मुलतानी माती
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मातीच्या थराला मृदा असेही म्हणतात. निरनिराळ्या ठिकाणच्या मातीत काही मृद्खनिजे (क्ले मिनरल्स) आढळतात. एखाद्या ठिकाणच्या मातीत कोणती मृद्खनिजे असतील ते तिथे कोणते खडक आहेत त्यावरून ठरते. मातीच्या विविध प्रकारांना रेताड, चिकण, गाळाची, काळी, […]