बळीराजा – अण्णासाहेब शिंदे पुरस्कार

बळीराजा’ या कृषिविषयक मासिकाचे संपादक यांच्याकडून मिळालेल्या देणगीच्या व्याजातून पुरस्कार दिला जातो. सन २०१२ पासून देण्यात येणारा हा पुरस्कार तीन वर्षातून एकदा देण्यात येतो. कृषीक्षेत्रातील उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला प्रोत्साहन म्हणून बळीराजा – अण्णासाहेब शिंदे पुरस्कार हा पुरस्कार दिला जातो. श्री. अण्णासाहेब शिंदे यांनी आयुष्यभर शेतीविषयक अभ्यास केला. वर्ष १९६२ ते १९७९ या काळात लोकसभा सदस्य तसेच १९६२ ते १९७७ दरम्यान केंद्रीय कृषिराज्यमंत्री असलेले अण्णासाहेब शिंदे यांचा भारताचे हरिक्रांतीची धोरण ठरविण्यात   सहभाग होता.

पुरस्काराचे स्वरूप : रोख रुपये १०,०००/- आणि सन्मानपत्र

पुरस्कार प्रदान : २८ एप्रिल २०२४ रोजी होणाऱ्या परिषदेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात

अर्ज करण्याची मुदत : १५ मार्च २०२४ (नमुना अर्ज डाऊनलोड करा)

संपर्क : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान, भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२

दूरध्वनी : (०२२) ४८२६३७५०/४८२६००९४.

भ्रमणध्वनी : ९९६९१००९६१ (सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान, मंगळवार खेरीज)

इ-मेल: office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org