खेळणी करा, खेळा आणि रोचक विज्ञान शिका | मराठी विज्ञान परिषदेने विज्ञान खेळणी तयार करण्यासाठी साहित्य संच तयार केला आहे. खेळणी साहित्य संचाबरोबर एक पुस्तिका दिलेली आहे. या पुस्तिकेत खेळणी तयार करण्याची कृती आणि त्यातील वैज्ञानिक संकल्पना यांची माहिती दिलेली आहे. संचातील साहित्य वापरून प्रकाश, दृष्टी, हवेचा दाब, घर्षण, ध्वनी आणि गुरूत्व मध्य यांतील वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित मजेदार, आकर्षक अशी दहा खेळणी तयार करता येतात. हस्तकौशल्यांचा विकास आणि वैज्ञानिक संकल्पनेचे आकलन या दोन्ही गोष्टी यातून साध्य होतात. विज्ञान खेळणी कार्यशाळा मागणीनुसार घेतली जाते. […]