Kutuhal

२१-३-२०२५ | भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

‘भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा’ (ग्राउंडवॉटर सर्व्हे अन्ड डेवलपमेंट एजन्सी) या संस्थेच्या स्थापनेचे मूळ आंतरराष्ट्रीय विकास संघटना (इंटरनॅशनल डेवलपमेंट असोसिएशन) आणि महाराष्ट्र राज्य शासन यांच्यात झालेल्या करारात आहे. त्या करारानुसार महाराष्ट्र शासनाने सन १९७२ मधे  […]

Kutuhal

२०-३-२०२५ | भूजल व बाष्पीभवन, बाष्पोत्सर्जन, अंतःसरण

भूजलाची उपलब्धता अनेक घटकांवर अवलंबून असते. पर्यावरण हा त्यापैकी एक मुख्य घटक आहे. भूपृष्ठावरून होणारा पाण्याचा व्यय म्हणजेच बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जन (इव्हॅपोट्रॅन्स्पिरेशन). भूपृष्ठावरील पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे वाफेच्या स्वरूपात वातावरणात मिसळते. या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. […]

Kutuhal

१९-३-२०२५ | जलधर

जमिनीच्या पृष्ठभागावरील पाणी जमिनीत झिरपून जमिनीखालील खडकांमध्ये साठून रहाते. त्या पाण्याला आपण भूजल म्हणतो. खडकांच्या काही विशिष्ट जलवैज्ञानिक गुणधर्मांमुळे (हायड्रॉलॉजिकल प्रॉपर्टीज) विहिरी आणि कूपनलिकेच्या माध्यमातून हे भूजल मिळवता येते. ज्या खडकांमधे भूजल साठते त्यांना जलधर […]

Kutuhal

१८-३-२०२५ | पूर व्यवस्थापन

भारतीय उपखंडातील लहरी हवामानाशी आपला परिचय आहेच. पूर ही एक भूवैज्ञानिक आपत्ती आहे. अलिकडच्या काळात हवामान बदलामुळे उन्हाचा कहर, पावसाचा अतिरेक, वादळे, गारपीट अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. कमी वेळात जास्त प्रमाणात पडलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे […]

Kutuhal

१७-३-२०२५ | बुधावरील सृष्टी चमत्कार

बुध हा सूर्यमालेतील आकाराने सर्वात लहान आणि सूर्याला सर्वात जवळ असणारा ग्रह आहे. बुध सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. त्याची कक्षगती सर्व ग्रहांमधे जास्त म्हणजे ४८ किलोमीटर प्रति सेकंद इतकी आहे. बुध सूर्याभोवती केवळ ८८ दिवसात […]

Kutuhal

१४-३-२०२५ | राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान अध्ययन केंद्र

पृथ्वीमधे तिच्या निर्मितीपासून ते आजपर्यंत झालेल्या भूवैज्ञानिक परिवर्तनांविषयी सखोल संशोधन करण्यासाठी, आणि त्यातून मिळालेल्या माहितीचे संकलन करण्यासाठी केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम इथे १९७८ साली ‘पृथ्वी विज्ञान अध्ययन केंद्र’ (सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज) ही संस्था स्थापन […]

Kutuhal

१३-३-२०२५ | कच्छचा महाभयानक भूकंप

२६ जानेवारी २००१ रोजी भारताचा बावन्नावा प्रजासत्ताकदिन साजरा होत असतानाच सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी गुजरात राज्यातल्या कच्छ आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांना भूकंपाच्या धक्क्याने जबरदस्त हादरे बसले. ९० सेकंद कालावधीच्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर प्रणालीप्रमाणे ७.७ […]

Kutuhal

१२-३-२०२५ | विस्मयकारक प्रवाळ भित्ती

जगातली सर्वात मोठी प्रवाळ भित्ती प्रणाली (कोरल रीफ सिस्टिम) ईशान्य ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड किनारपट्टीलगत असून ती ‘महा अवरोधक भित्ती’ (ग्रेट बॅरियर रीफ) या नावाने ओळखली जाते. जवळपास २,३०० किमी लांब पसरलेल्या प्रवाळ भित्तींच्या या समूहाने सागरातळाचे […]

Kutuhal

११-३-२०२५ | रत्नांचा रंग : सारा प्रकाशाचा खेळ

रत्नांनी मानवी जीवनात एक अनोखे स्थान निर्माण केले आहे. रत्नांची झळाळी तर मनाला भावतेच, पण रत्नांचा आकर्षकपणा आणखी वाढतो तो त्यांच्या मोहक रंगछटांनी. कोणत्याही पदार्थावर पांढरा प्रकाश पडतो तो विविध रंगांनी मिळून बनलेला असतो. वस्तूचे […]

Kutuhal

१०-३-२०२५ | रत्नविज्ञान आणि आपण

रत्न म्हणजे खूप दुर्मिळ, पराकोटीची आकर्षक आणि अत्यंत टिकाऊ वस्तू होय. त्यांचा वापर लोक आपली आभूषणे किंवा अन्य काही वस्तू सजवण्यासाठी करत असतात. दुर्मिळ असूनही रत्नांना बाजारात खूप मागणी असते. त्यामुळे रत्ने खूप महाग असतात. […]