रसायन विज्ञान सप्ताह

२९ जुलै ते ५ ऑगस्ट २०२३

भारतातील रसायनशास्त्राच्या प्रगतीमध्ये आचार्य प्रफुल्लचंद्र राय यांचे अमुल्य योगदान आहे.  कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. १८९६मध्ये  राय  यांनी  मर्क्युरस  नायट्रेटचा शोध  लावला व प्रथमच  भारतात १८९२मध्ये  त्यांनी  बेंगॉल  केमिकल  अँड  फार्मास्युटिकल  वर्क्स  हा   पहिला  औषध  निर्मिती  कारखाना  काढून भारतात रसायान उद्योगाचा पाया रचला.

त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा जन्म दिवस २ ऑगस्ट हा  मराठी विज्ञान परिषदेतर्फे २००७ सालापासून नियमितपणे ‘रसायन दिन म्हणून साजरा केला जातो.

यावर्षी प्रथमच  रसायन दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी विज्ञान परिषदेने २९ जुलै ते  ५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ‘रसायन विज्ञान सप्ताह आयोजित केला आहे.

याअंतर्गत खालील कार्यक्रम घेतले जातील.


 • प्रयोगशाळेतील रसायनशास्त्राचे प्रयोग/ Chemistry Lab Experiments
  मराठी  विज्ञान  परिषदेने रसायन दिनानिमित्ताने ‘प्रयोगशाळेतील रसायनशास्त्राचे प्रयोग’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दि.  २९ जुलै २०२३ (शनिवार, शाळेला मोहरम सुट्टी) रोजी घेण्यात येईल… (अधिक माहितीसाठी क्लिक करा.. >>)

 • मनोरंजक विज्ञान
  रसायन विज्ञान सप्ताहांतर्गत ‘मनोरंजक विज्ञान’ या नि:शुल्क कार्यक्रमाचे आयोजन चेंबूर येथील ‘आमची शाळा’ येथे शनिवार, दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये ‘आम्ल-आम्लारी’ या विषयातील प्रयोगांचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल.

 • रसायन दिन कार्यशाळा
  भारताच्या रसायन उद्योगाचा पाया रचणार्‍या आचार्य प्रफुल्लचंद्र राय यांच्या कार्याच्या सन्मानार्थ  २ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस  मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘रसायन दिन’ म्हणून साजरा केला जातो. या रसायन  दिनानिमित्ताने बुधवार, दिनांक २ ऑगस्ट २०२३ रोजी विज्ञान भवनात विद्यार्थ्यांना रसायनशास्त्रातील प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम नि:शुल्क आहे.

 • रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई (ICT) – भेट
  या कार्यक्रमाअंतर्गत दिनांक ३ ऑगस्ट २०२३  रोजी  सकाळी ११.०० ते दुपारी  ४.०० या वेळेत मुंबई-माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेला ( Institute of Chemical Technology, Matunga- Mumbai) भेट आयोजित केली आहे. यामध्ये शिक्षक आणि प्रयोगशाळा साहाय्यकांना रसायन तंत्रज्ञान संस्थेतील अनेक प्रयोगशाळांपैकी तीन प्रयोगशाळा बघण्याची संधी मिळेल. विज्ञान शिक्षकांना आणि प्रयोगशाळा साहाय्यकांना या भेटीचा निश्चितच उपयोग होईल.  या कार्यक्रमात शिक्षक आणि प्रयोगशाळा साहाय्यक, असे एकूण ५० व्यक्तींना सहभागी होता येईल. एका शाळेतून एकापेक्षा जास्त शिक्षक, प्रयोगशाळा साहाय्यक सहभागी होऊ शकतात. ही भेट नि:शुल्क आहे.इच्छुकांनी २४ जुलैपर्यंत    https://forms.gle/RVjCuGs6WCg5J8x4A    हा गुगल फॉर्म भरुन नोंदणी करावी.त्वरा करा, मर्यादित (फक्त ५०) जागा. प्रथम फॉर्म भरणार्‍यास प्राधान्य दिले जाईल.

३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता ‘इंस्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ माटुंगा,मुंबई येथे गेटजवळ जमावे.
जेवणाचा डबा आणावा.
पूर्वनोंदणी आवश्यक.


 • रसायनशास्त्रावरील व्याख्यान
  शनिवार,  दिनांक  ५ ऑगस्ट  २०२३  रोजी सकाळी ११ ते १२  या वेळेत महर्षी दयानंद महाविद्यालय,  परळ  येथे आंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता ‘Future Chemistry’ या विषयावर प्रा. श्रीरंग जोशी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.  हे  व्याख्यान नि:शुल्क आहे.कार्यक्रम स्थळ: महर्षी दयानंद महाविद्यालय, २५, डॉ. एस एस राव मार्ग, परळ, मुंबई- ४०० ०१२