Programs

शहरी शेती ओळखवर्ग – ३ सप्टेंबर २०२३

गच्ची / बाल्कनी किंवा इमारतीच्‍या परिसरात जेथे किमान चार तास सूर्यप्रकाश उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी भाजीपाला, फळे लागवडीचे तंत्र म्‍हणजेच ‘शहरी शेती’. […]

Programs

विज्ञान दर्पण – २७ ऑगस्ट २०२३

मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षिक सभेला जोडून सकाळच्या सत्रात ‘मला आवडलेले पुस्तक’ कार्यक्रम (१९९१ पासून) सलग २५ वर्षे आयोजित केला गेला. सन २०१७मध्ये त्यात बदल करून ‘विज्ञान दर्पण’ या शीर्षकाखाली एका वेगळ्या कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यामध्ये दरवर्षी एक विषय (मुलभूत अथवा प्रासंगिक) निवडून कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
या विषयी आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर … […]

Pariksha

पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा

मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९९८ सालापासून मराठी माध्यमातून, तर २००४ सालापासून इंग्रजी माध्यमातून पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा घेतल्या जातात. कोविड-१९ मुळे स्थगित ठेवलेल्या या परीक्षा २०२३-२४ वर्षात पुन्हा सुरु करत आहोत. […]

Programs

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा – २०२३

मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून म्हणजेच २०१५ पासून मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी विज्ञान एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. शैक्षणिक आणि खुल्या अशा दोन गटांत घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्याही विषयावर आधारलेली एकांकिका सादर करता येते. […]

No Picture
Programs

प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार २०२३

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान संशोधनाची आवड निर्माण करावयाची असेल तर त्यांना शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी स्वत: संशोधन करायला हवे. अध्यापनासह गुणवत्तापूर्ण संशोधन करणाऱ्या अशा महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी विज्ञान परिषदेने ही पुरस्कार योजना २०१४ पासून सुरु केली आहे. केंद्र शासनाकडून वेतन अनुदान मिळत असलेल्या शैक्षणिक संस्था वगळून महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठे (ज्यात खाजगी आणि अभिमत विद्यापीठेही समाविष्ट आहेत), तसेच महाराष्ट्र राज्यात स्थित असलेली महाविद्यालये यातील शिक्षक-गण या पुरस्कारांसाठी विचारात घेतले जातात. विद्यापीठ स्तरावर एक व महाविद्यालयीन स्तरावर एक असे दोन पुरस्कार दिले जातात. […]

No Picture
Programs

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार २०२३

विविध अभियांत्रिकी शाखांतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करुन ते तंत्रज्ञान व्यावहारिक तसेच समाजाभिमुख वापराकरिता संशोधन करणाऱ्या तरुण अभियंत्याना (वय वर्षे चाळीस अथवा त्यापेक्षा कमी) हा पुरस्कार दिला जातो. […]

No Picture
Lectures

विज्ञानगंगा व्याख्यानमाला – वैद्यकात अतिसूक्ष्मतंत्रज्ञान

मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने  विज्ञानगंगा व्याख्यानमाला ‘वैद्यकात अतिसूक्ष्मतंत्रज्ञान’ वक्ते – डॉ.प्रशांत कृ.देशमुख, प्राचार्य, डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय, मलकापूर, जिल्हा बुलढाणा रविवार दिनांक ६ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी […]

No Picture
Programs

प्रयोगशाळेतील रसायनशास्त्राचे प्रयोग

मराठी  विज्ञान  परिषदेने रसायन दिनानिमित्ताने ‘प्रयोगशाळेतील रसायनशास्त्राचे प्रयोग’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दि.  २९ जुलै २०२३ (शनिवार, शाळेला मोहरम सुट्टी) रोजी घेण्यात येईल. […]

Programs

रसायन विज्ञान सप्ताह

भारतातील रसायनशास्त्राच्या प्रगतीमध्ये आचार्य प्रफुल्लचंद्र राय यांचे अमुल्य योगदान आहे.  कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. १८९६मध्ये  राय  यांनी  मर्क्युरस  नायट्रेटचा शोध  लावला व प्रथमच  भारतात १८९२मध्ये  त्यांनी  बेंगॉल  केमिकल  अँड  फार्मास्युटिकल  वर्क्स  हा   पहिला  औषध  निर्मिती  कारखाना  काढून भारतात रसायान उद्योगाचा पाया रचला. […]