Kutuhal

११-०९-२०२५ | सूक्ष्मजीवांचे संकलन आणि मोजणी

पर्यावरणातील जिवंत सूक्ष्मजीवांचे विशेषतः जीवाणू आणि बुरशी यांचे संकलन आणि मोजणी करताना सांख्यिकीय आणि गुणवत्तापूर्ण मोजमाप केले जाते. अत्यंत संवेदनशील अशा जैवतंत्रज्ञान उद्योगात अंतर्गत तसेच सभोवतालच्या परिसराची, विविध उंचीवरील सूक्ष्मजीवांची तपासणी करतात. प्रसंगी संकलनासाठी ड्रोन्सचाही […]

Kutuhal

१०-०९-२०२५ | पाण्याची सूक्ष्मजीवशास्त्रीय प्रतवारी

मॅक क्रेडी या शास्त्रज्ञाने १९१५ साली ‘मोस्ट प्रोबेबल नंबर’ या तंत्राने संख्याशास्त्रीय पद्धत वापरुन पाण्याच्या नमुन्यातील जीवाणूंची संख्या मोजण्याचे तंत्र विकसित केले. पुढे त्यावर संशोधन करून कोचरेन यांनी १९५० साली ही पद्धत प्रमाणित केली. पाण्यातील […]

Kutuhal

०९-०९-२०२५ | सांडपाण्याच्या रासायनिक गुणवत्तेची चाचणी

सांडपाण्यातील विषारी सेंद्रीय आणि असेंद्रीय पदार्थांची तीव्रता मोजण्यासाठी सीओडी (मिलिग्रॅम/लीटर) हे एकक वापरतात. हे मोजमाप सेंद्रीय आणि असेंद्रीय पदार्थांच्या ऑक्सिडीकरणासाठी लागलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण दर्शवते; त्याला ‘केमिकल ऑक्सीजन डिमांड’ किंवा ‘सीओडी’ असे म्हणतात. ही त्या सांडपाण्याच्या […]

Kutuhal

०८-०९-२०२५ | सांडपाण्याच्या जैविक गुणवत्तेची चाचणी

पाण्यातील सेंद्रिय पदार्थाचे विघटन करण्याच्या जैविक प्रक्रियेत सूक्ष्मजीवांद्वारे वापरल्या जाणाऱ्या विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण म्हणजे बीओडी. याला ‘जैविक ऑक्सिजनची मागणी’ असेही म्हणतात. सेंद्रिय पदार्थ जेवढे जास्त, तेवढी सूक्ष्मजीवांची ऑक्सिजनसाठी मागणी जास्त; हे त्याचे तत्व आहे. शहरवस्तीचे […]

Kutuhal

०५-०९-२०२५ | डीएनएच्या संरचनेचा फोटो क्र. ५१

डीएनएच्या एक्स-रे क्रिस्टलोग्राफिक फोटो-५१शिवाय आणि ज्या विदुषीने हा फोटो काढला, त्या ‘रोझॅलिंड फ्रँकलिन’ यांच्याशिवाय डीएनएच्या संरचनेचा शोध लागला नसता! विज्ञान जगतात फोटो-५१ अजरामर झाला परंतु रोझॅलिंड फ्रँकलिन उपेक्षित राहिल्या. डीएनएच्या संरचनेचा शोध म्हणजे गेल्या शतकातील […]

Kutuhal

०४-०९-२०२५ | डीएनए अंगुलीमुद्रण : नैसर्गिक ओळखपत्र

नुकताच अहमदाबादला भीषण विमान अपघात झाला. आपल्या नातेवाईकांची ओळख पटवण्यासाठी लोकांची रीघ लागलेली होती. जळून गेलेले मृतदेह ओळखायचे कसे? नातेवाईक आले होते त्यांच्या रक्ताचे नमुने देण्यासाठी! अर्थातच त्यांचा डीएनए देण्यासाठी. तो कोणाशी जुळतो ते ठरवण्यासाठी! […]

Kutuhal

०३-०९-२०२५ | सूक्ष्मजीवसुद्धा संवाद साधतात!

संवाद ही केवळ माणसांपुरती मर्यादीत संकल्पना नाही. माणसांप्रमाणेच प्राणी, पक्षी, झाडे आणि अगदी सूक्ष्मजीवही एकमेकांशी संवाद साधतात. जीवाणूंमध्ये होणाऱ्या संवादाला क्वोरम सेंसिंग असे म्हणतात. या प्रक्रियेत, जीवाणू स्वतःच्या संख्येच्या आधारे रासायनिक रेणूंमार्फत एकमेकांशी संवाद साधत […]

Kutuhal

०२-०९-२०२५ | जीन थेरेपी : नव्या युगाची पहाट!

जीन थेरपी या आधुनिक जैवतंत्रज्ञानामुळे जनुकीय आजारांसारख्या दुर्धर रोगांवर उपचार शक्य होऊ लागले आहेत. सर्व सजीव पेशींपासून बनलेले आहेत आणि त्या पेशींचे कार्य डीएनए वरील जनुकांद्वारे नियंत्रित होते. ही जनुके म्हणजे पेशींना सूचना देणारे माहितीचे […]

Kutuhal

०१-०९-२०२५ | चार अक्षरांची जनुकीय भाषा

आपल्या शरीरातील पेशीत आढळणारा डीएनए हा प्रचंड माहितीचा संग्रह आहे. आपली उंची किती असेल, डोळ्यांचा रंग कसा असेल, आपल्याला कोणते आजार होऊ शकतात, यांसारख्या असंख्य गोष्टींची माहिती जनुकांच्या रुपात डीएनएमध्ये लपलेली असते. या पूर्ण माहितीच्या […]

Kutuhal

२८-०८-२०२५ | राष्ट्रीय पेशीविज्ञान केंद्र

पुणे विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागात डॉ. उल्हास वाघ यांच्या नेतृत्वाखाली १९८६ साली ‘राष्ट्रीय ऊतीसंवर्धन सुविधा (नॅशनल टिश्यू कल्चर फॅसिलिटी)’ हा प्रकल्प भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळ यांच्या ‘पेशीसंग्रहालय’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू झाला. […]