राष्ट्रीय विज्ञानकथा दिन
मराठी साहित्यामध्ये विज्ञानकथा हा कविता, नाटक, चरित्रे यासारखा एक वेगळा साहित्य प्रकार सुरु होऊन आता ५० वर्षे झाली. त्याचे जाहीर कौतुक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून दुर्गा भागवत, पु.ल.देशपांडे आणि पु.भा.भावे यांनी त्या-त्या वेळी केले होते. डॉ. जयंत नारळीकर, डॉ. बाळ फोंडके, श्री. निरंजन घाटे, श्री. सुबोध जावडेकर, श्री. लक्ष्मण लोंढे, डॉ. मेघश्री दळवी या विज्ञानकथा लेखकांनी या साहित्य प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून दिली. […]