
प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार २०२३
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान संशोधनाची आवड निर्माण करावयाची असेल तर त्यांना शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी स्वत: संशोधन करायला हवे. अध्यापनासह गुणवत्तापूर्ण संशोधन करणाऱ्या अशा महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील शिक्षकांना प्रोत्साहन देण्याकरिता मराठी विज्ञान परिषदेने ही पुरस्कार योजना २०१४ पासून सुरु केली आहे. केंद्र शासनाकडून वेतन अनुदान मिळत असलेल्या शैक्षणिक संस्था वगळून महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठे (ज्यात खाजगी आणि अभिमत विद्यापीठेही समाविष्ट आहेत), तसेच महाराष्ट्र राज्यात स्थित असलेली महाविद्यालये यातील शिक्षक-गण या पुरस्कारांसाठी विचारात घेतले जातात. विद्यापीठ स्तरावर एक व महाविद्यालयीन स्तरावर एक असे दोन पुरस्कार दिले जातात. […]